| सहकारनामा |
इंदापूर : राज्यात सध्या कोरोनाचा फैलाव वाढल्याने मोठ्या प्रामाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे देश परदेशातून ऑक्सिजन आणून येथील रुग्णाची गरज भागवली जात आहे मात्र याच ऑक्सिजनचा काहीजण काळाबाजार करून त्याचा साठाही करत असल्याचे समोर येत असून आक्सिजनचा विनाकारण साठा करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
आज इंदापूर तालुक्यातील लोणी येथे अशीच एक कारवाई करण्यात आली असून सुमारे 72 ऑक्सिजन सिलेंडरचा साठा करून ठेवल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुणे ग्रामिण चे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे
यांना कारवाईचे आदेश दिले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 9 वाजता पोलीस पथक कारवाई करायला गेले असता तेथे जवळपास 72 सिलेंडर मिळून
आले. त्यामध्ये 51 सिलेंडर भरलेले तर 21 सिलेंडर रिकामे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.
हा छापा लोणी MIDC मधील एका कंपनीवर टाकून तेथून हे सिलिंडर जप्त केले असून संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.