| सहकारनामा |
पुणे : आजच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या दीप्ती काळे या महिला आरोपीचा ससून रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज पुण्यात घडली आहे.
दीप्ती काळे नी आत्महत्या केली की तीचा पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात खाली पडून मृत्यू झाला याबाबत अजून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दीप्ती काळे आणि त्याच्या साथीदारावर बळवंत मराठे या सराफ व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात दीप्ती काळे हिला अटक करण्यात येऊन तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिच्यावर पुण्यातील ससून या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. ससून रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पोलिसांची एक धावपळ उडाली. दीप्ती ने आत्महत्या केली की पळून जाण्याचा प्रयत्न करताना खाली पडून मृत्यू झाला याबाबत पोलीस तपास करत असून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पळून जात असताना खाली पडून मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज..
दीप्ती काळे चा मृत्यू झाल्यानंतर पुण्याच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी माहिती देताना दीप्ती काळे हिने खिडकीच्या काचा काढून बाहेर निघून पळून जाण्याचा प्रयत्न केला असावा आणि पाईप किंवा अरुंद जागेतून खाली उतरताना खाली पडून तिचा मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.