इंदापूर : इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचे वृत्त असून एका शाळेमध्ये हॉलिबॉल खेळाचे उदघाटन करताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन पाटील हे इंदापूर येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या समवेत व्हॉलीबॉल खेळत होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या पुढील उपचार घेत आहेत. मी आपणा सर्वांच्या सेवेत प्रत्यक्ष उपलब्ध नसलो तरी फोनद्वारे मी व माझे कार्यालय आपणास उपलब्ध असेल. आपण काळजी करण्याचे कारण नाही. मी आपणा सर्वांच्या सेवेत लवकरच पुन्हा दाखल होईल अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व श्री नारायणदास रामदास हायस्कूल व जूनियर कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यामानाने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हर्षवर्धन पाटील हे या स्पर्धेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांच्या समवेत व्हॉलीबल खेळण्याचा आनंद घेत होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरून त्यांना ही दुखापत झाली आहे.