‘सहकारनामा’ चा अंदाज 100 टक्के खरा ठरला | दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदी ‘उत्तमराव आटोळे’ यांची निवड

दौंड : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) अध्यक्षपदी उत्तमराव आटोळे यांची निवड करण्यात आली आहे. उत्तमराव आटोळे यांचे पारडे जड असून त्यांच्या निवडीची शक्यता सहकारनामा ने वर्तवली होती ती 100% टक्के खरी ठरली आहे. उत्तमराव आटोळे यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिले आहे.

दौंड तालुका अध्यक्ष पदाच्या शर्यतिमध्ये ‘उत्तमराव आटोळे’ यांचे पारडे ‘जड’..!

सविस्तर वृत्त.. https://sahkarnama.in/uttamrao-atole-in-the-daund-taluka-presidents-race-heavy/

सहकारनामा ने वर्तवला होता अंदाज, 100% खरा ठरला

उत्तम राव आटोळे यांनी या अगोदर पंचायत समिती उप सभापतिपद भूषवले असून त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच दोन्ही पती, पत्नी ग्रामपंचायतीला एकाचवेळी निवडून आले होते. उत्तमराव आटोळे हे माजी आमदार रमेश थोरात यांचे विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

उत्तमराव आटोळे यांच्या निवडीने रावणगाव, पूर्व पट्ट्यात तसेच संपूर्ण दौंड तालुक्यात आनंद साजरा करण्यात येत आहे. माजी आमदार रमेश थोरात आणि सुनील तटकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.