सुधीर गोखले
सांगली : मिरज पंढरपूर महामार्गावर असलेल्या धाबे आणि हॉटेल्समधून सुरु असलेल्या अवैध मद्यपान करणाऱ्या मद्यपी आणि धाबे चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून माध्यमांमधून या हॉटेल्स आणि ढाब्यांवर चाललेल्या अवैध मद्यपानाबाबत तक्रारी येत होत्या.
राज्य उत्पादन शुल्क चे जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क चे भरारी पथक आणि मिरज विभागीय निरीक्षक यांनी मिरज पंढरपूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गावरान सह तीन हॉटेल्सवर अचानक छापा टाकून मद्यपींसह त्या हॉटेल्स चे मालक आणि चालक यांच्या वर कारवाईचा बडगा उगारला आहे. अचानक पडलेल्या छाप्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर मिरज पासून काही अंतरावर हे धाबे आणि हॉटेल्स आहेत. या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढल्याने पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे हे चांगलेच ऍक्शन मोड मध्ये आले आहेत.
पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विभागाचे निरीक्षक ए.एस कोळी आणि त्यांची टीम
पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विभागाचे निरीक्षक ए.एस कोळी आणि त्यांची टीम अनधिकृत, अवैध मद्य वाहतूक आणि मद्यपींवर लक्ष ठेऊन आहेत. याबाबत ‘सहकारनामा’ प्रतिनिधिंनी प्रदीप पोटे यांच्याशी संपर्क साधला असता, यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरु राहणार असून अवैध धंदे करणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.