अर्ध्या किंमतीत वाहने, शेती औजारे देण्याचे आमिष दाखवून ‘वरवंड’ येथील परिवाराकडून महिलेची 7 लाख 29 हजारांची फसवणूक

वरवंड (दौंड) : दौंड तालुक्यातील डाळिंब येथील महिलेला अर्ध्या किंमतीत वाहने, शेती औजारे घेऊन देतो म्हणून सुमारे 7 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत वरवंड येथील एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती चंद्रकांत केदारी, चंद्रकांत केदारी, सौरभ चंद्रकांत केदारी, गौरव चंद्रकांत केदारी (सर्व रा. वरवंड ता. दौंड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कोमल अमोल सुतार (रा. डाळिंब, ता. दौंड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

https://youtu.be/Ow9IILA9z44?si=J-FuEr2PMp70-hKk
हेही पहा..

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुलै 2020 पासुन ते 2022 पर्यंत
माझेकडुन व माझे माहेरच्या लोकांकडुन आरोपिंनी रोख 1 लाख 40 हजार रूपये व
ऑनलाईन 5 लाख 89 हजार रूपये असे
एकुण 7 लाख 29 हजार रूपये घेऊन विविध
शेतीची अवजारे व मोटारसायकल, ट्रॅक्टर
अर्ध्या किंमतीमध्ये विकत देतो असे म्हणुन
घेतले होते. परंतु ठरल्याप्रमाणे तीन महीन्यांमध्ये त्यांनी कोणतीही वस्तु न देता आमची संगणमताने फसवणुक केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.