मराठा आंदोलक लाठी हल्ला प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची माफी तर अजित पवार यांचे चॅलेंज

मुंबई : जालना येथील अंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची शासनाच्या वतीने माफी मागतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तर जे आमच्यावर आरोप करतात की आंदोलकांवर लाठी हल्ला करण्याचा आदेश आमच्याकडून गेला आहे त्यांनी ते सिद्ध करावे माझ्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघे राजकारण सोडू, मात्र जर हे सिद्ध करता आले नाही तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावे असे चॅलेंज त्यांनी यावेळी दिले.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागत मी पाच वर्ष गृहमंत्री होतो. या काळात अनेक आंदोलने झाली मात्र कधी बळाचा उपयोग केला नाही त्यामुळे जे लाठी हल्ल्यात जखमी झाले आहेत त्यांची माफी मागतो असं फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पावले उचलली जात असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.