रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांची यवत पोलिसांकडून ‛धरपकड’, 50 जणांच्या अँटीजेन टेस्टमध्ये 3 पॉझिटिव्ह



| सहकारनामा |

दौंड : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून त्या धर्तीवर राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी पोलिसही आपापल्या परीने चोख बंदोबस्त ठेऊन मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. 

आज दि.30 एप्रिल रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच कारवाई करण्यात आली असून या हद्दीत सनियंत्रण समिती सदस्य यांच्या उपस्थितीत यवत हॉटस्पॉट गावांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या 50  लोकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये  3 लोकांची कोविड टेस्ट पॉझिटिव मिळून आली असून त्यांना उपचार कामी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, कोरोनाची चैन तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच बसावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.