जवाहरलाल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मुकुंद भिसे यांची नियुक्ती

दौंड : केडगाव ता. दौंड येथील नेताजी शिक्षण संस्थेच्या जवाहरलाल विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राचार्यपदी प्राध्यापक मुकुंद भिसे सर यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्राचार्य जालिंदर काटे सर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मुकुंद भिसे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुकुंद भिसे सर दि. १/०६/१९९३ रोजी विद्यालयात पेटीचे शिक्षक म्हणून रुजू झाले होते. शालेय क्रीडा प्रकारात त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले आहेत ज्यामध्ये ७ आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि ३३ राज्यस्तरीय दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. भिसे सरांचे बीए (१) बीपीएड (१) (डी एस एम) असे शिक्षण झाले आहे. त्यांनी असंख्य विद्यार्थि घडवले आहेत.


भिसे सर यांच्या निवडीनंतर संस्था अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष अशोक शेळके, लुंकड, सुभाष अवचट, सुनील निंबाळकर यांनी भिसे सरांचे पुष्पहार, श्रीफळ देऊन अभिनंदन केले.