दौंड : मागील वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान मोदींना दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी एक मागणी केली होती. आज एका वर्षानंतर मात्र ती मागणी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.
वैशाली नागवडे यांनी गेल्या वर्षि राखी पोर्णिमेदिवशी देशाचे पंतप्रधान मोदींना विनंती केली होती कि, घरगुती एलपीजी दर वाढ कमी करून देशातीला माता, बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट देऊन दिलासा द्यावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी राखी पौर्णिमेनिमित्त मात्र देशातील माता, बघीनींना मोठी भेट दिली असून एलपीजी गॅसवर तब्बल 200 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
या निर्णयावर वैशाली नागवडे यांनी समाधान व्यक्त केले असून इथुन पुढ़े ही आम्ही महिलांसाठी विविध मागण्या करत राहू आणि त्या पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच आजच्या राखी पोर्णिमेनिमित्त विधानसभा आणि लोकसभामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत महिलांना आरक्षण देण्यात येईल व प्रत्येक महिलेला देशात सुरक्षित वाटेल ही अपेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली आहे.