|सहकारनामा|
दौंड : केडगावचे जेष्ठ नागरिक बबन (भाऊ) महादेव शेळके यांचे आज शनिवार दि.1 मे रोजी पहाटे राहत्या दुःखद निधन झाले ते 63 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
बबनभाऊ शेळके हे केडगाव परिसरातील प्रगतशील बागायतदार होते तसेच ते पाटबंधारे विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना सामाजिक कार्यात विशेष रस होता.
बबनभाऊ शेळके यांच्या निधनाची खबर मिळताच केडगावमधील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.