खुटबाव वि.का.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मा.आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत संपन्न, संस्थेतर्फे जेनेरीक मेडिकल सुरू होणार

अब्बास शेख

दौंड : खुटबाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीत पार पडली असून दौंडचे माजी आमदार रमेश  थोरात यांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना लाभले. यावेळी खुटबाव विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने जेनेरीक  मेडिकल सुरू करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.  या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील विषयांवर चर्चा झाली ज्यामध्ये..

  1. मागील वार्षिक सर्व साधरण सभा दि. 15/09/2022 प्रोसिंडींग वाचून कायम करणे.
  2. दि.01/04/2022 ते 31/03/2023 अखेर संपलेल्या वर्षाची तेरीज ताळेबंद व नफा तोटा पत्रके वाचून कायम करणे.
  3. सन 2022/2023 चे लेखापरिक्षण अहवालास मान्यता देउन दोष दुरुस्ती अहवाल पाठवण्याबाबत विचार करणे.
  4. आदर्श उपविधी दुरुस्ती करणेबाबत
  5. सन 2023/2024 साठी वैधानिकलेखापरिक्षकाची नेमणुक करणे.
  6. पुणे जि.म.स. बॅककडे सन 2023/2024 सालाकरीता कर्ज मागणी चे अधिकार देणे.
  7. थकबाकी वसुलीबाबत विचार करणे.
  8. मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळी येणा-या विषयांचा विचार करणे असे विविध विषय यावेळी घेण्यात आले.

या सभेला सोसायटीचे चेअरमन महेश थोरात, व्हाईस चेअरमन सुनील फणसे व इतर संचालक तसेच भाऊसाहेब ढमढरे, जी. के थोरात सर, नवनाथ थोरात सर, आर.डी थोरात व सर्व ग्रामस्थ व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेची सभासद संख्या १३४६ तसेच तेरा संचालक व दोन स्वीकृत सदस्य आहे. नवीन जनरिक मेडिकल संस्थेतर्फे टाकणार