Political : पंढरपूर निवडणूक निकाल (Pandharpur Election) – महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ‛काटे की टक्कर’ 10 व्या फेरी अखेर भजोप चे पारडे ‛जड‛



| सहकारनामा |

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा येथील विधानसभेच्या पोट  निवडणूकीची मत मोजणी सुरू असून येथे दोन्ही उमेदवारांमध्ये अतिशय चुरस निर्माण सुरू झाली आहे. सध्या महाविकास आघाडीचे भगीरथ भालके हे तिसऱ्या फेरीनंतर   साधारण 350 ते 400 मतांनी पुढे होते. मात्र पुढील आठव्या आणि नवव्या फेरीअखेर  भाजपचे समाधान अवताडे हे जवळपास  1200 ते 1500 मतांनी पुढे असल्याचे समोर येत आहे. यात भगीरथ भालके यांना भाजप चे समाधान अवताडे काटे की टक्कर देताना दिसत आहेत.

हि विधानसभा निवडणूक मंगळवेढा तालुका आणि  पंढरपूर तालुक्‍यातील 35 गावे, शहर असा पंढरपूर- मंगळवेढा असा विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके हे महाविकास आघाडीकडून तर भाजपकडून समाधान आवताडे हे निवडणूक रिंगणात होते. सध्या सुरू असलेल्या मतमोजनीमध्ये या दोन उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.

या निवडणुकीत शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे या बंडखोर उमेदवार म्हणून उभ्या होत्या मात्र त्यांचा यात जास्त प्रभाव दिसत नाही.

जवळपास साडे तीन लाखाच्या घरात येथील मतदारांची संख्या असून या मतदार संघात राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू,

प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभा घेत आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.

या निवडणुकीत  65% मतदान झाले होते.