दौंड : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रेट स्पोर्ट्स ऍकॅडमीच्या वतीने देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी संपूर्ण एक तास स्केटिंग करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या सहाय्याने जागतिक विक्रमही करण्यात आला.
स्केटिंगच्या सहाय्याने जागतिक विक्रम करण्यासाठी चार संस्थांनी नोंद घेतली ज्यामध्ये 1) इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड 2) ग्लोबल जीनियस रेकॉर्ड 3) दि मिराकल रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि 4) वज्र वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांनी याची नोंद केली. यामध्ये महाराष्ट्रातून तब्बल 35000 मुलांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला यामध्ये आपल्या ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या 29 मुलांनी सहभाग घेतला होता. या निमित्त मुलांना सन्मानित करण्यासाठी दौंड तालुक्याचे युवा नेते तुषार थोरात, केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, डॉक्टर निलेश लोणकर, संदीप टेंगले, शरद पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्केटिंगच्या या रेकॉर्डमध्ये आर्यन जगदाळे, क्षितिज कुंभार, ऋत्विक कुंभार, अंश यादव, दिशा कुंजीर, आदिती शेळके, कृष्णा पाटील, आशिष अघमकर, स्वामिनी बारवकर, आरुष गोलांडे, चैतन्य शितोळे, हर्षल शेंडगे, ओजस शेळके, राजनंदनी शितोळे, श्रीजीत आहेरकर, स्वरूप शेलार, आर्यन कुंभार, अर्णव कुंभार, राजवीर दळवी, रुद्र आहेरकर, पार्थ माने, प्रणिती दुधाळ, ओम ताकवणे, जयंत भापकर, आर्यन कोळपे, अजित पवार, कौस्तुभ शिर्के, हर्षवर्धन देशमुख यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना समाधान दाणे, गणेश घुगे, आकाश कसबे, अनुराधा निकम, श्रीनाथ गडदे, रोहित बर्डे व आर्यन शेलार या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.