Fir against corona positive patient – कोरोना असूनही मोकाट फिरत असाल तर सावधान! 4 कोरोना बाधितांवर गुन्हा दाखल



| सहकारनामा |

बीड : जर एखाद्याला कोरोना (Covid 19) झाल्याचे निदान झालेय आणि तरीही ते बाहेर मोकाट फिरत असतील तर आता त्यांच्यावर गंभीर गुन्हे (Fir against corona positive patient ) दाखल होऊ शकतात त्यामुळे जर तुमचे कोणी नातेवाईक, मित्र अथवा घरातील मेंबर कोरोना (Covid 19) पॉझिटिव्ह असतील आणि ते बाहेर फिरण्याचा विचार करत असतील तर हि बातमी त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल.

बीड जिल्ह्यामध्ये अशीच मोठी कारवाई करण्यात आली असून बीड च्या वडवणी या शहरातील कोविड सेंटरमधून फळे आणि खाद्य पदार्थ आणण्याच्या बहाण्याने बाहेर पडून मोकाटपणे फिरणाऱ्या कोरोनाबाधित 4  रुग्णांवर (Fir against corona positive patient) हि कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील छत्रपती शाहू महाराज कोविड सेंटरमध्ये वडवणी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांनी कोविड सेंटरमधून बाहेर पडून मोकाट फिरत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते.  

विशेष म्हणजे त्यांनी तोंडावर मास्क ही लावले नव्हते आणि आपल्या कृतीमुळे अन्य लोकांनाही याची बाधा होऊ शकते हे माहीत असताना त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांच्यावर  कोविड सेंटरचे निरीक्षक  यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.