दौंड : दौंड तालुक्यातील पाटस दरोड्याच्या तयारीत असलेली रेकॉर्डवरील टोळी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. सोलापूर पुणे हायवेच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या तलावाच्या बाजूला आरोपी दरोड्याच्या तयारीत होते.
यवत पोलिसांनी आरोपी इसम १) दत्ता अशोक शिंदे (वय २८ रा.राहू ता.दौंड जि. पुणे) २) सचिन लक्ष्मण भोसले (वय ३९ रा.आष्टी ता.आष्टी जि. बीड) ३) सचिन संतोष बेलदार (वय २१ रा.येवला ता.येवला जि .नाशिक) ४) मल्हार अंबादास अडागळे (वय २४ रा.रवळगाव ता.कर्जत जि .अहमदनगर) या आरोपींना एक गावठी पिस्टल, काडतुस, कोयता, कटावणी, चार चाकी वाहनासह व दरोड्याचे मुद्देमालसह पकडले असून आरोपी ५) मामा उर्फ मैत्रीण रिकेबी (रा.कुर्डुवाडी ता.माढा जि. सोलापूर) हा पळून गेला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ४,४९,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी नंबर १ व ३ हे यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८४०/२०२३ भा. द.वि.कलम ३६४ मध्ये फरार असून सर्व आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. तसेच आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपींनी यवत पोलीस स्टेशन, शिरूर, मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत डीपी चोरीचे गुन्हे केलेचे कबूल केले असून आरोपींकडे सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले,पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार संजय देवकाते,निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप,अजित काळे,मेघराज जगताप,प्रमोद गायकवाड, महेंद्र चांदणे,राजीव शिंदे, पो.काॅ.मारूती बाराते,समीर भालेराव यांनी केलेली आहे.