Daund | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल

दौंड : लग्नाचे आमिष दाखवून दौंड शहरातील एका मुलीवर गेली दोन वर्षे सलग बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी आरोपी करण धनराज बेंद्रे (रा-घंटाचाळ दौंड, ता-दौंड जि-पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सदर पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील असून तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन आरोपी हा तिला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दोनवर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिला. आरोपी हा पीडित मुलीला गोड बोलुन त्याच्या घरी घेवुन जात असे आणि मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे आमिष दाखवुन तिच्यासोबत सोबत शाररीक संबंध ठेवत असे. या सर्व प्रकरानंतर पीडिता ही आपल्या आईसोबत दुसऱ्या एका ठिकाणी रहायला गेली.

मात्र ती घरी एकटी असताना करण धनराज बेंद्रे हा त्यांच्या घरासमोर यायचा. माझेसोबत चल असे पीडितेला म्हणायचा मात्र पीडितेने त्याला नकार दिला की, तो तिला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवुन तिला त्याच्या मोटार सायकलवर बसवुन कुरकुंभ (ता-दौंड जि-पुणे) येथील गणेश लॉजवर घेवुन जाऊन तिथे तिच्यावर बलात्कार करायचा.
असेच 5 मे रोजी पीडित मुलगी ही घरी एकटी असताना करण हा त्याठिकाणी आला आणि मला तुझ्या सोबत लग्न करायाचे आहे तु माझेसोबत चल असे म्हणून तिला त्याच्या घरी घेवुन गेला. लग्न करतो असे सांगुन ठाणे पुन्हा पीडित मुलीसोबत शाररीक संबंध ठेवू लागला.

दिनांक 29 जुलै रोजी पीडितेचा वाढदिवस असल्याने तिने, तु माझेसोबत लग्न कधी करणार असे आरोपीला विचारले असता ‛करु’ असे त्याने उत्तर दिले. त्यानंतर पीडितेच्या आई ने करण याचे घरी येऊन तु माझ्या मुलीला का ठेवुन घेतले आहे अशी विचारणा केली असता मी तिचेशी लग्न करणार आहे असे म्हणून तिला घालवून दिले आणि पीडितेला जबर मारहाण केली. करण हा फक्त लग्नाचे आमिष दाखवून आपला उपभोग घेत असल्याची खात्री पीडितेला झाल्यानंतर तिने पुन्हा त्यास लग्नाबाबत विचारणा केली आणि मी पोलीस स्टेशनला जाईल असे म्हणताच आरोपीने पीडित मुलीला मारहाण केली तसेच पोलीस स्टेशनला गेली तर मी बाहेर आल्यावर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली होती.

मात्र हा सर्व प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडित मुलीने दौंड पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून आरोपीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, मारहाण करणे आणि धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.