Police action – दुकानदार, विना मास्क, मोकाट फिरणाऱ्यांवर यवत पोलिसांची धडक कारवाई, 16 हजारांचा दंड वसूल



| सहकारनामा |

दौंड : कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक अजूनही नियम मोडत असून या नियम मोडणाऱ्या लोकांवर यवत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  

आज दि. 4 मे रोजी यवत पोलिसांनी संचारबंदी आणि शासकीय नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे 16 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हि कारवाई यवत, केडगाव आणि पाटस येथे करण्यात आली असून यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या ११ जणांवर  केसेस करून त्यांच्याकडून 5500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर वेळ संपल्यानंतरही दुकाने सुरू ठेऊन शासकीय नियमांचा भंग करणाऱ्या 8 दुकानांवर केसेस करून त्यांच्याकडूनही  5500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

तर तिसरी कारवाई हि दुचाकींवर मोकाट फिरणाऱ्यांवर करण्यात आली आहे. 

यात 5 दुचाकींवर केसेस करून त्यांच्याकडून सुमारे 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आजच्या कारवाईत एकूण 16 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.