अख्तर काझी
दौंड : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती दौंड शहरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति संस्था, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती (साठे नगर), मातंग समाज एकीकरण समिती तसेच दौंड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेला दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले, मा.आमदार रमेश थोरात, मा. नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, नागसेन धेंडे, गुरुमुख नारंग, अनिल सोनवणे, सचिन कुलथे, निलेश नेटके, बी. वाय. जगताप या मान्यवरांनी आपल्या मनोगतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचविण्याचे काम सध्याच्या युवा पिढीने केले पाहिजे असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. बहुजन रयत परिषदच्यावतीने संविधान आणि अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचे वाटपही यावेळी करण्यात आले.
यंदाच्या उत्सव समितीचे पदाधिकारी आबासाहेब वाघमारे, सागर सोनवणे ,उमेश तूपसौंदर्य ,सोमनाथ आगलावे, सुरेश तूपसौंदर्य, संजय मोरे, विवेक मोरे ,सिद्धार्थ कसबे, रमेश खुडे, दत्तू घोडे यांनी आयोजन केले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लहुजी यंग ब्रिगेड संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी फुलांनी सजविलेल्या व्यासपीठावरील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाची प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती.
समाज बांधवांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. संघटनेच्या वतीने 500 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. नितीन तूपसौंदर्य ,निखिल भोकरे, हिरन खुडे, दत्तात्रय तूपसौंदर्य, तुकाराम
तूपसौंदर्य, सुरज रणपिसे, ऋतिक लोंढे, गणेश यांनी आयोजनात सहभाग घेतला.