Ajit pawar lockdown meeting in pune – पुण्यात संपूर्ण लॉकडाउन होणार? अजितदादांच्या पुण्यातील बैठकीकडे लागले सर्वांचे लक्ष



| सहकारनामा |

पुणे : 

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे त्यामुळे (Ajit pawar lockdown meeting in pune) मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यात लॉकडाउन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवताना पुण्यातील कोरोनामुळे बाधित होणाऱ्यांची स्थिती अद्यापही गंभीर आहे त्यामुळे पुणे आणि ज्या बाधित ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या ठिकाणी मागील वर्षासारखे लॉकडाउन लावा असे म्हटले आहे.

हि सर्व परिस्थिती पाहता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यात आढावा बैठक (Ajit pawar lockdown meeting in pune) घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. हि बैठक आजच होणार असून या बैठकीत पुण्यात  लॉकडउन लावण्याबाबत चर्चा होणार असल्याचे पुढे येत आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बैठक हि विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असल्याचे आणि त्यात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत असून  यावेळी रुग्णसंख्या आटोक्यात या बैठकीत पुण्यातील कोरोनाची सद्य स्थिती आणि पुण्यात लॉकडाउन लावण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.