Breaking News | भीमा पाटस कारखान्यात घोटाळा नाहीच, आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट

मुंबई : भीमा पाटस कारखान्यामध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे आज राज्यसरकारकडून जाहीर करण्यात आले असून त्यामुळे आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाली आहे. या क्लीन चिट मुळे खा.संजय राऊत मात्र तोंडघशी पडले आहेत.

आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून सविस्तर माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणात राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

भीमा पाटस साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झालेला नाही. 2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये. मात्र 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं उत्तर राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाला देण्यात आलं आहे. तर इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची  नेमणूक केली असून, अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.