| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील आणि परिसरातील 23 गावांमधील 81 जण कोरोना बाधित असल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालात समोर आले आहे. यवत ग्रामिण रुग्णालयात एकूण 215 जनांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये 81 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 134 जण निगेटिव्ह आले आहेत.
दि. 05/05/2021 रोजी यवत ग्रामिण रुग्णालयाकडून कोविड 19 साठी हे 215 स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 47 पुरुष आणि 34 महिलांचा समावेश असून पुढील प्रमाणे त्यांची गावनिहाय आकडेवारी आहे.
यवत -14, नानगाव -4, राहू -7, बोरिपारधी -3, पिंपळगाव -9, कानगाव -1, केडगाव -10, कडेठान -3, खामगाव -2, कसुर्डी – 1, बोरिऐंदी -1, नाथाचीवाडी -5, खोर – 1, चौफुला -2, सादलगाव – 1, भांडगाव – 2, नायगाव -2, उरुळी कांचन -5, वरवंड -1, जावाजीबुवाचीवाडी -3, देवकरवाडी – 2,
गाडगीळवस्ती – 1, नागरगाव – 1