Social Work – बाबा फाउंडेशनच्या वतीने दौंड उपजिल्हा रुग्णालयाला झेरॉक्स मशीन भेट! सामाजिक कार्यकर्ते शौकत सय्यद आणि कुटुंबियांचा पुढाकार



| सहकारनामा |

 दौंड : अख्तर काझी

रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर येथील बाबा फाउंडेशन व भारत सिक्युरिटी सर्विस चे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते शौकत सय्यद व त्यांच्या परिवाराकडून येथील उपजिल्हा रुग्णालयाला झेरॉक्स व स्कॅनर मशीन भेट देण्यात आली. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. दीपक जाधव, डॉ. दत्ता वाघमोडे, डॉ.अजीम शेख व व्यावसायिक सलीम इनामदार आदि उपस्थित होते.

 डॉ. संग्राम डांगे यावेळी म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे त्या कामी या साधन सामुग्रीची गरज होती तसेच रुग्णालयामध्ये कोरोना तपासणी व करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते यांची संपूर्ण माहिती संकलित करावी लागते त्यासाठीही या मशीनची खूप मदत मिळणार आहे. रुग्णालयाची ही गरज ओळखून शौकत सय्यद व परिवाराने अगदी योग्य वेळी मदत केली आहे त्यांचे खूप आभार.

परिवारातील सद्दाम, सजद,व अकबर सय्यद यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले असे शौकत सय्यद म्हणाले.