Murder | अखेर दिड वर्षानंतर ‛वरवंड’ येथील खूनाला वाचा फुटली, वहिनीच्या वडिलांचा ‛या’ कारणासाठी चौघांनी मिळून केला ‛खून’

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड या गावमध्ये खुनाची एक भयानक घटना उघडकीस आली असून वहिनेचे वडील हे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इस्टेटमध्ये वहिनीला हिस्सा देणार नाहीत म्हणून वहिनीच्या वडिलांना वरवंड येथील फॉरेस्ट जमिनीत घेऊन जाऊन इतर लोकांच्या मदतीने त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत कालीदास शिवदास शिंदे, (वय- 46 वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. वरंवड ता.दौड जि पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादिवरून आरोपी 1) अतुल जगताप, 2) प्रणव भंडारी, 3) विजय मंडले 4) राकेश भंडारी (सर्व रा.वरंवड ता.दौड जि.पुणे) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 27/03/2022 रोजी राकेश भंडारी, याने आपली वहिनी सौ सपना राहुल भंडारी यांना त्यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी हे त्यांचे मरणा नंतर मालमत्तेमध्ये हक्क देणार नाही यासाठी अतुल जगताप, प्रणव भंडारी, राकेश भंडारी, विजय मंडले (सर्व रा.वरंवड ता.दौड जि.पुणे) यांची मदत घेवुन दिनांक 27/03/2022 रोजी वरंवड गावातील फॅारेस्ट जमीनीमध्ये सुरेश नेमीचंद गांधी यांचा गळा दाबुन खुन केला व पुरावा नष्ट करण्यासाठी ते घरामध्ये पाय घसरून पडुन मयत झाले असे सांगुन त्यांचा अंत्यविधी केला होता.

ही घटना दि. 27/03/2022 रोजी 11ः00 च्या दरम्यान घडली होती. मात्र आज त्याबाबतची तक्रार देण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोनि हेमंत शेडगे, सपोनि वाबळे, पोसई मदणे यांनी भेट दिली. अधिक तपास सपोनि वाबळे करीत आहेत.