पुणे : वरील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे असा मेसेज येऊन तुमच्या मोबाईल फोन ची रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका.कारण हे भारत सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात आलेली एक टेस्ट होती तुम्हाला नैसर्गिक अपत्तीवेळी खबरदार करणार आहे.
आज सकाळी दहा नंतर अनेकांच्या मोबाईलवर अचानकपणे रिंग वाजून स्क्रिनवर अलर्ट असा मेसेज आला. या मेसेजमुळे अनेकांची घाबरगुंडी उडल्याची पाहायला मिळाले. अनेकांनी याबाबत आपल्या मित्रांना फोन केले तर काही सरकारी कर्मचारी मात्र हा आपल्यावर ट्रॅप तर लावला गेला नाही ना! आपला फोन रेकॉर्ड केला जात आहे की काय.! अश्या शंकेने घामाघूम झाले. या कॉल अलर्टबाबत काहीवेळाने माहिती प्रसिद्ध होऊन ही एक अलर्ट टेस्ट होती आणि ती होते सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार करण्यात आल्याचे समोर आले.
भविष्यात महत्वाच्यावेळी या सिस्टमद्वारे नागरिकांना अलर्ट करण्यात येणार असून नैसर्गिक आपत्ती, अतिवूर्ष्टी, भूकंप, वैद्यकीय मदत, आणीबाणी यांची माहिती या द्वारे दिली जाऊ शकते. आपल्या परिसरात किंवा शहरात काही घटना घडली किंवा आणीबाणी सारखी परिस्थिती असेल किंवा काही अलर्ट सरकारला द्यायचे असतील त्यावेळी ही सिस्टीम कारगर ठरणार आहे. या साठी यंत्रणेची टेस्टिंग चालु असल्याने कुणीही घाबरून जाऊ नये.