शिक्रापूर : शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास असलेला धोकादायक इसम केतन गोरख दरेकर, (वय २० वर्षे, रा.डोंगरवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याला याचेविरूध्द यापुर्वी दरोडा घालणे,
फायटरसारखे शस्त्राचा वापर करून संगणमत करून स्त्रीचा पाठलाग करून विनयभंग
करणे, संगणमत करून कट रचुन जबरी चोरी करणे, व्यक्तीस मृत्यु किंवा जबर
दुखापत करण्याची भिती घालुन त्यांच्याकडुन खंडणी स्विकारणे, संगणमत करून आपखुशीने साधी दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल होते.
तो सराईत धोकादायक असल्याने त्याच्यावर एम. पी. डि.ए कायद्यांतर्गत कार्यवाही होणेकामी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, (शिक्रापूर पोलीस स्टेशन) यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना प्रस्ताव सादर केला होता. मा.पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध्य शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विक्री करणारे, अवैध्य वाळु व्यवसाय करणारे, अवैध्य दारू विक्री करणारे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणाऱ्या धोकादायक व्यक्ती व्यक्तींविरुद्ध विशेष मोहिम राबवित आहेत.
यासाठी त्यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दरोडा, जबरी चोरी, खंडणीची मागणी करून खंडणी स्विकारणारे धोकादायक व्यक्ती यांची समाजातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी
व अशी कृत्ये करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील
सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती विरूध्द कारवाईचा
बडगा उगारून एम. पी. डि.ए कायदयांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश पुणे ग्रामीण
पोलीसांना दिले आहेत.
त्याच अनुषंगाने वरील व्यक्तीबाबत सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा.पोलीस अधीक्षक यांनी तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे राजेश देशमुख यांनी इसम केतन गोरख दरेकर, (वय २० वर्षे, रा.डोंगरवस्ती सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे)
याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासुन प्रतिबंध
करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर व जिवनावश्यक वस्तुचा काळा बाजार
करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीचा कायदा सन 1981 (सुधारणा 2015) अन्वये 1 वर्षाकरिता येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.