Crime – कोरोना बाधित मृतांच्या अंगावरील कपडे चोरून त्यावर ब्रँडेड स्टिकर लावून बाजारात विकणारी टोळी पोलिसांनी पकडली



| सहकारनामा |

बुलंदशहर : मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणे हि म्हण आपण ऐकली असेल मात्र या म्हणीचा खरा प्रत्यय आता समोर आला आहे. मृतदेहांच्या अंगावरील कपडे चोरून त्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून ती बाजारात विकणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. विशेष म्हणजे हि टोळी कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या अंगावरीलही कपडे चोरून विकत असल्याचे समोर आल्याने पोलीस खातेही चक्रावले आहे. 

या गंभीर गुन्ह्या प्रकरणी बाघपत पोलिसांनी श्रीपाल जैन, आशीष जैन, राममोहन, अरविंद जैन, ईश्वर, वेदप्रकाश, मोबीन या सात जणांना अटक केली आहे. हे सर्वजण बडोत शहरातील रहिवासी आहेत.

https://twitter.com/baghpatpolice/status/1391336115039137792?s=19

बाघपत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या स्टाफसह रविवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करत असताना त्यांना एका गाडीमध्ये ब्रॅण्डेड कपडे असल्याचे दिसले. इतके कपडे एका गाडीत जा चालवले असतील अशी शंका आल्याने त्यांनी या कपड्यांच्या  याबाबत गाडीतील व्यक्तींना विचारणा करत या कपड्यांचे बील आणि इतर कागदपत्रं दाखवा असा आदेश दिला. मात्र या मालाचे बिल आणि कागदपत्रे या इसमांकडे नसल्याचे त्यांचा संशय बळावला. आणि त्यांनी पोलिसी स्टाईलने विचारपूस करताच संबंधित इसमांनी हे कपडे  मृतांच्या शरीरावरील असून ते आपण चोरी करून बाजारात विकत असल्याचे कबूल केले.

पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता या लोकांनी आपण मृत्युमुखी पडलेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू आलेल्या मृतांच्या अंगावरील कपडे चोरून धुवून त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचा शिक्का लावून विकत असल्याचे कबुल केले.

पोलिसांनी या आरोपींकडून मृतदेहावर टाकण्यात येणाऱ्या 520 चादरी, 127 कुर्ते, 140 पॅण्ट, 34 धोतरं, 12 गरम शाली, 52 साड्या, 03 रेबिन चे पाकिटे, 158 ब्रँडेड कंपन्यांचे स्टिकर जप्त केले आहेत.