| सहकारनामा |
दौंड : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने दौंड मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या गुजराती भवन कोविड सेंटर ला आज दौंड अर्बन बँकेचे चेअरमन प्रेमसुख कटारिया, गोविंद अग्रवाल, बाबा शेख, ॲड. अजित बलदोटा,नगरसेवक शहानवाज पठाण व अर्बन बँकेचे व्यवस्थापक कुलकर्णी आदींनी भेट देत रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या गुजराती कोविड सेंटरच्या सेवेमध्ये आपला सुद्धा हातभार लागावा म्हणून आर्थिक मदतही देवू केली.
विशेष म्हणजे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या सोनवणे ताई यांनी कोरोना वर मात करीत बरे होऊन घरी परतताना सेंटरला एक हजार रुपयांची भेट देऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले.
येथील उद्योजक राजेंद्र उगले यांनी आपले वडील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वि.रा. उगले(काका) यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुजराती भवन कोविड सेंटरला 25 हजार रु., पंतप्रधान कल्याण निधीला 1 लाख, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस कल्याण निधी ला 1 लाख 25 हजार रू तसेच सिंधी मंगल कार्यालय येथील कोविंड सेंटरला 25 हजार रुपयांची मदत केली आहे.
शहरातील सर्वच कोविड सेंटरला येथील दानशूर व्यक्ती मोठी मदत करीत असल्याने दौंडकरांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.