| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे किरकोळ कारणावरून बेकायदा जमाव जमवून कोयता आणि लोखंडी गजांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संगीता अशोक गायकवाड यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.09 मे रोजी यवत येथील चोबे मळा येथे सायंकाळी 7:30 वाजता फिर्यादीच्या घरा समोर वरील 7 आरोपी यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून फिर्यादींचे पती अशोक गायकवाड यांना तुम्ही आम्हाला रस्त्याने जाता येता आडवयाचे नाही असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी लोखंडी कोयत्याने अशोक गायकवाड यांच्या डोक्यात मारहाण केली तर इतर आरोपींनी लोखंडी गजाने त्यांच्या उजव्या बाजुचे बरकडीवर, करंगळीवर मारहाण करून त्यांना जबर जखमी केले.
तर यातील महिला आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी, करून लाकडी काठीने मारहाण केली असल्याचे आणि त्यांचा मुलगा अमोल गायकवाड यास आरोपींनी हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारहाण प्रकरणी यवत पोलिसांनी विजय सोपान गायकवाड, ऋषिकेश विजय गायकवाड, रोहित विजय गायकवाड, छाया विजय गायकवाड, सोपान निवृत्ती गायकवाड, उत्तम ज्ञानोबा गायकवाड आणि प्रसाद संजय गायकवाड (सर्व राहणार चोबे मळा, यवत ता.दौंड जि.पुणे)
यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.