स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ‛या’ महिन्यात होण्याची शक्यता

मुंबई : अनेक महिन्यांसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या भावी उमेदवारांचा जीव आता भांड्यात पडला आहे.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान होण्याची शक्यता असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका राजपत्राच्या आधारे सांगितले जात आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाने सूचना देण्यात आल्या आहेत.

ओबीसी आरक्षनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत?
याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल काही संकेत देण्यात आले असले तरी दुसरीकडे मात्र ओबीसी आरक्षणाचा निकाल अजून रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील मुंबई-पुण्याह 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्च रोजी संपली आहे.