सिंदखेडराजा : बुलढण्यातील एका प्रवासी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन त्यामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. या प्रवासी बसमध्ये 33 प्रवासी होते ज्यातील 8 प्रवासी हे बसचा अथक प्रयत्न करून बसच्या बाहेर पडले त्यामुळे ते बचावले गेले.
ही भीषण घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर घडली असून ही प्रवासी बस पुण्याला निघाली होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस चा टायर फुटून अपघातग्रस्त बस ही अगोदर महामार्गावरील रस्ता दुभाजकाला किंवा तेथील खांबाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला अशी माहिती समोर येत आहे.
बस अपघातग्रस्त होताच त्यातील डिझेल ने पेट घेतला आणि यात संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला आणि यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. प्रवाश्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी बस च्या खिडक्या फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले आणि आतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. यावेळी बस चा चालक आणि वाहक मात्र बचावले. यातील जखमींना येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर… भिषण अपघात होऊन यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद असून यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.