केडगाव येथील ‛जवाहरलाल महाविद्यालयात’ “आंतरराष्ट्रीय तृणधान्य” कार्यक्रमाचे आयोजन

दौंड : दौंड तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. श्रीवल्लभ अवचट यांनी तृणधान्याचे महत्त्व तसेच त्यापासून आरोग्यास होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यावेळी प्रा.ओंकार अवचट यांनी तृणधान्यापासून बनविता येणारे विविध पदार्थ व त्याची आहारामध्ये असणारी गरज व यापासून मिळणारे पोषण विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच जमिनीची पिकवण क्षमता वाढवण्यासाठी अथवा पीक फेरपालट म्हणून हे पीक घेणे गरजेचे आहे हे सांगितले.

यावेळी आर.के.पवार (कृषी पर्यवेक्षक राहु ), टी.के रडे (कृषी सहाय्यक केडगाव), एस.एस लोणकर (कृषी सहाय्यक गलांडवाडी), व्ही. बी बारवकर (कृषी सहाय्यक नानगाव) यांच्यासह जवाहरलाल महाविद्यालयाचे प्राचार्य. बी. बी. म्हस्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महादेव थोपटे यांनी केले तर आभार आर. के.पवार यांनी मानले.