विकास शेळके
पारगाव : दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा) च्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांनी यावेळी पारगाव शाखेला आवर्जून भेट दिली.
पारगाव शाखेत ३१ मार्च २०२३ अखेर पर्यंत २४ कोटी ३६ लाख रुपयांच्या ठेवी असून मार्च अखेर पर्यंत शाखेला १ कोटी ९६ लाख रुपायांचा नफा झाला आहे. या शाखेतून २ कोटी ३३ लाख बिगरशेती कर्ज वाटप करण्यात आले असून शेती कर्ज वाटप २८ कोटी इतके आहे. बँकेच्या सभासदांची संख्या १० हजार ५०० असून यावर्षी मार्च अखेर शाखेला १ कोटी ९६ लक्ष रुपयांचा नफा झाला आहे.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी बोलताना, आपली पुणे जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली आणि विश्वासाला पात्र ठरलेली बँक असून या बँकेच्या पारगाव सारख्या असंख्य शाखांनी ही बँक मजबूत केली आहे आणि यापुढेही अधिक मजबूत होत राहील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गावचे आजी माजी पदाधिकारी, दौंड विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी ,कर्मचारी ,ग्रामस्थ ,परिसरातील शेतकरी, सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.