अख्ख ‛कुटुंब’ आजारी असतानाही ‛आमदार’ म्हणतायत बोला तुमची काय ‛अडचण’..

अब्बास शेख

दौंड : आपल्या घरातील लहान मुले, कुटुंबीय आजारी असतील आणि आपल्यालाही थोडी कणकण, ताप असेल तर आपली शारीरिक आणि मानसिक परिस्थिती काय असते हे आपल्यालाच माहीत. अश्यावेळी जर कोणी आपल्याकडे एखादी अडचण किंवा काम घेऊन आले तर आपले उत्तर काय असते..? हे सांगायची गरज नाही. आपण आपली सर्व कामे सोडून फक्त आपल्या कुटुंबियांची सेवा करण्यात वेळ देतो आणि स्वतःही अराम करत असतो हे निर्विवाद सत्य आहे, कारण म्हणतात ना जान है, तो जहाँन है… मात्र यालाही काही व्यक्ती कायमच अपवाद ठरत आल्या असून त्यातील एक म्हणजे दौंड चे आमदार राहुल कुल…

तसे पाहिले तर आमदार राहुल कुल यांची ही पारिवारिक आणि खाजगी अशी अंतर्गत बाब आहे, मात्र जनतेच्या सेवेसाठी नेतेमंडळींना त्यांच्या कुटुंबियांना, काय यातना सहन कराव्या लागतात, काय बलिदान द्यावे लागते हेही जनते समोर यायला हवे या हेतूने ‛सहकारनामा’ ना या घटनेचा पाठपुरावा केला आहे आणि यातील सत्य जनते समोर आणले आहे.

झाले असे की दररोजच्या दिन क्रमाप्रमाणे शुक्रवारी सकाळीही आमदार राहुल कुल यांच्या निवस्थानी नागरिकांची गर्दी मोठी गर्दी जमली होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माजी आमदार रंजनाताई कुल खाली हॉलमध्ये दाखल झाल्या. काहीवेळ त्यांनी लोकांशी वार्तालाप करून लग्नसमारंभांसाठी बाहेर जायचे आहे असे म्हणत लोकांची रजा घेतली. थोड्या वेळात जिन्याच्या पायऱ्या उतरून प्रसिद्ध डॉक्टर सचिन भांडवलकर हे गुपचूप पणे दरवाजातून निघून गेले. काही वेळात आमदार राहुल कुल हेही जमलेल्या नागरिकांच्या घोळक्यात येऊन बसले आणि बोला काय अडचण आहे असे म्हणत दररोजच्या कामात व्यस्त झाले. शिर्के इकडे ये यांचा फोन लाव, त्यांना निरोप देऊन बोलवून घे, पोपटराव कुठे आहे, यांचं काय प्रकरण आहे ते लोक समोर बोलवून मिटवून टाकू अश्या सूचना करत आपल्या कामात व्यस्त होऊन गेले, मात्र आज आमदारांच्या चेहऱ्यावर थोडे चिंतेचे भाव दिसत होते. तर लोकांच्या गर्दीतून वाट काढत आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी धडपड करणारी मायरा आज कुठेच लुडबुड करताना दिसत नव्हती, ना किचन रूममध्ये कसला गोंगाट दिसत होता, ना आदी ची इकडून तिकडे जाण्याची लगबग दिसत होती, ना कांचन ताईंचा लोकांमध्ये बसून गप्पा मारत दादांचा भार हलका करतानाच प्रयत्न दिसत होता या सर्वांची पोकळी येथील जुन्या जाणकारांना निश्चितच जाणवत होती. हे सर्व पाहून साहजिकच आज काहीतरी वेगळं वातावरण आहे हे किंबहुना येथे उपस्थित असणाऱ्या ‛सहकारनामा’ प्रतिनिधींच्या लक्षात आले आणि त्यामुळे आता विचारायचे कोणाला म्हणून अखेर त्यांनी गुप्त सूत्रांचा मार्ग अवलंबवत याची माहिती घेतली. माहिती घेत असताना मोठी आश्चर्यकारक घटना समोर आली.

आमदार राहुल कुल यांची लाडकी मायरा, आदित्य हे व्हायरल इन्फेक्शन आणि तापाने फणफणले होते, कांचनताई सुद्धा आजारी होत्या आणि यावर कडी म्हणजे लोकांच्या गाऱ्हाणी ऐकून त्यांची कामे मार्गी लावणारे दादा सुद्धा ही कणकण आणि व्हायरल ने जाम होते आणि तरीही हे सर्व दुःख लपवून ही व्यक्ती लोकांचे गाऱ्हाणे ऐकत त्यावर तोडगे काढत होती आहे यावर विश्वासच बसत नव्हता. जणू काही झाले नाही असे दाखविण्याचा आणि आपल्या चेहऱ्यावर आपल्या कुटुंबियांप्रति असलेली काळजी लपविण्याचा प्रयत्न एक पिता, एक पती करत होता. तसाच प्रयत्न एक आजी, एक सासू ही करत होती हेही नंतर उघड झाले.

हे सर्व विलक्षण होते. कारण घरातील मुले, मंडळी, कुटुंबीय आजारी पडले तर आपली काय अवस्था होते हे आपल्याला माहीत आहे. गेल्या दोन-तीन दिवसंपासून हे अख्ख कुटुंब तापाने आणि व्हायरल इन्फेक्शन ने फणफणलं होतं मात्र याचा पत्ता त्यांनी कुणालाच लागू दिला नाही. लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे पॉश गाडी, उच्च राहणीमान आणि कायम जनता आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणाऱ्या नेतेमंडळींच्या अंतर्गत जीवनात किती संघर्ष असतो त्यांना कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर कश्या पद्धतीने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो हे घटनेवरून मात्र प्रकर्षाने समोर आले आहे.