| सहकारनामा |
पुणे : आज पुणे जिल्ह्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या 437 जनांवर पोलिसांनी कडक कारवाई (police action) करत त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 95 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. इंदापूर येथे मोकाट फिरणाऱ्या एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना (covid-19) वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळणाऱ्या हॉटेल, मंगलकार्यालय, शॉपिंग सेंटर, हॉकर्स यांच्यावर आज पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगराई सर्कल येथे प्रतिक हनुमंत काळे, (रा.पळसदेव काळेवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे) हा विना मास्क विनापरवाणा वाहन नं. 42बी.बी 4716 वरून फिरत असताना मिळुन आल्याने त्याच्यावर इंदापुर पोलिसांनी भा.द.वि.कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30, 34, 33, 41, 51 भारतीय साथ रोग कायदा 1897 चे कलम 3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील हि कारवाई डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशाने पुणे ग्रामीण पोलीस दल
हद्दीत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये पारीत केलेल्या आदेशाची अवहेलना केलेल्या इसमांवर करण्यात आलेली आहे.