Kolhapur | पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, आई-वडिलांचा आक्रोश

कोल्हापूर : हुपरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे खेळता खेळता पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एक चिमुकला पडून त्याचा मृत्यू झाला. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सुदाम फार्म या या कंपनीमध्ये सध्या बांधकाम सुरू आहे. यासाठी लागणारा पाणीसाठा खड्ड्यामध्ये भरून ठेवला होता. खेळता खेळता दीड वर्षाचा चिमुकला या खड्ड्यात पडला आणि यात त्याचा मृत्यू झाला. या चिमुकल्याचे नाव विराज अमोल मलवाणे असे असून हुपरी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची याची नोंद करण्यात आली आहे.

पंचतारांकित औद्योगिक वसाहती मधील सुदान फार्म या कंपनीची तळंदगे गावाजवळ उभारणी करण्यात येत आहे. या कंपनीमध्ये अमोल अशोक मालवाणे हे सुरक्षारक्षकाचे काम करत असून त्यांचे वास्तव्य ही कंपनीच्या आवारामध्येच आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विराज हा चिमुकला खेळता खेळता घराबाहेर आला आणि पाणी साठवून ठेवलेल्या खड्ड्यात पडला. बराच वेळ गेल्यानंतर बाळ कुठे खेळताना दिसत नसल्याचे आढळून आल्याने अमोल व त्याच्या पत्नीने शोधा शोध सुरू केली.

यावेळी पाणी साठवलेल्या खड्ड्यात बाळ आढळून आले. त्याला बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपचाराआधीच हे बाळ मृत झाल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे या बाळाच्या आई-वडिलांवर दुःखाचा पहाड कोसळला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.