प्लॅस्टिक साहीत्य विक्रेत्या दुकानांवर करवाई, सहा दूकानदारांकडून दंड वसुल

सुधीर गोखले

सांगली : महापालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने आज महापालिका क्षेत्रामध्ये सिंगल युज प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर छापेमारी करत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

सांगलीतील गणपती पेठ वखारभाग परिसरासह प्रमुख बाजारपेठे मधील ६ दुकानांवर छापेमारी करून जवजवळ ३० हजार तर मिरज मधून २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी रवी मातकर आणि महापालिकेच्या पथकाने केलेल्या संयुक्त तपासणीत सहा आस्थापनांनी शासनाने बंदी घातलेले प्लास्टिक विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले आहे. प्रत्येक आस्थापनेला ५ हजार प्रमाणे ६ आस्थापनांकडून ३० हजार दंड वसूल करण्यात आला तर ३० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

कारवाई केलेल्या आस्थापना मध्ये एम के प्लास्टिक, दुर्गा प्लास्टिक, मोना प्लास्टिक, आरती डिस्पोजल, आर आर विभुते, जी एम मेडिकल चा समावेश आहे. कुपवाडमध्येही फळ फुले आणि भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत प्रत्येकी १०० रु दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये महापालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्राणिल माने, राजू कांबळे कोमल कुदळे, अंजली कुदळे, पंकज गोंधळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे उत्कर्ष होवाळे यांनी सहभाग घेतला होता.