Sahkarnama Iffect |‛सहकारनामा’ च्या बातमीची झेड.पी. मुख्य कार्यकारी अधिकारी ‛आयुष प्रसाद’ यांच्याकडून दखल, प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रश्न सुटणार

राहुल अवचर

देऊळगाव राजे : देऊळगाव राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या अपूर्ण संख्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे वृत्त ‛सहकारनामा’ ने काल प्रसिद्ध केल्यानंतर पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या वृत्ताची दखल घेत या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन ‛सहकारनामा’ चे प्रतिनिधी राहुल अवचर यांच्याशी संवाद साधताना दिले.

सहकारनामा च्या बातमी नंतर पुणे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी येथील वेद्यकिय अधिकारी अविनाश अलमवार यांच्याशी संपर्क करून या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुजू असलेल्या प्रत्येक अधिकारी यांची चौकशी करत या अधिकाऱ्यांना मुख्यालय जवळ राहण्याचे आदेश दिले असून पुरुष कर्मचारी यांची रात्रपाळी साठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी तीन दिवसासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. सहकारनामा च्या बातमीने दोन वर्ष रात्रंदिवस काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.