Crime : पाईपलाईनच्या वादातून बिरोबावादीमध्ये तुफान ‛हाणामारी’! 11 जणांवर गुन्हा दाखल



| सहकारनामा |

दौंड : सध्या कोरोना महामारीचे संकट आ वासून उभे आहे. सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी चे आदेश लागू आहेत मात्र हे आदेश लागू असले तरी काही ठिकाणी मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवून किरकोळ कारणांवरून मोठ्या हाणामारीच्या घटना घडत आहेत.

दौंड तालुक्यातील बिरोबावाडीमध्येही अशीच एक घटना घडली असून या प्रकरणी यवत पोलिसांनी 11 जनांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिरोबावाडी येथील शेतजमीन गट नं. 857 मध्ये हि हाणामारीची घटना घडली असून याबाबत फिर्यादी गबाजी जगन्नाथ खारतोडे (रा.बिरोबावाडी ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली कि शेतातील पाईप लाईन दुरूस्त करण्याचे कारणावरून त्यांना  आरोपी बाळू खारतोडे, विशाल खारतोडे, विकास खारतोडे, पांडुरंग खारतोडे, सुहास खारतोडे, सुनील खारतोडे, मधुकर खारतोडे, शुभम खारतोडे, किरण खारतोडे, महेश खारतोडे, अनिल खारतोडे (सर्व रा.बिरोबावाडी,ता.दौंड) या सर्वांनी मिळून फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ, भाच्यास संगनमताने लाथाबुक्कयाने, दगडाने, लोखंडी गजाने व पाईपने मारहाण करून शिवीगाळ केली. 

तसेच यावेळी फिर्यादीचा व्हिओ कंपनीचा मोबाईल फोडुन त्याचे नुकसान केले आहे. हि घटना पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या किरकोळ वादातून घडली असून गबाजी खारतोडे यांच्या  फिर्यादीवरून 11 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.