दौंड : दौंड तालुक्यातील बोरी भडक येथे संत श्री.तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होताच त्यांचे स्वागत खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात यांनी केले. यावेळी खासदार सुळे, आ.कुल, मा.आ.थोरात यांनी श्री तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यावेळी सुळे यांसोबत वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आ. राहुल कुल यांसोबत त्यांच्या पत्नी कांचन कुल व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार सुप्रीया सुळे यांनी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखी सोबत चालण्याचे भाग्य लाभले. वारकऱ्यांच्या सोबत ग्यानबा तुकाराम या जयघोषात वारीचा सोहळा अनुभविणे हा विलक्षण अनुभव असतो. यावेळी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन राज्यात आबादानी असू द्या अशी प्रार्थना केली असल्याचे म्हटले.
तर आमदार राहुल कुल यांनी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन श्रीक्षेत्र देहू येथून जगदगुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत निघालेला वैष्णवांचा मेळा दौंड तालुक्यात दाखल झाला असता उपस्थित राहून पालखी सोहळ्याचे स्वागत केले व जगदगुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. यावेळी उपस्थित वारकरी बांधवांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे म्हटले आहे.
रात्री पालखी सोहळा महालक्ष्मी मंदिर, यवत येथे मुक्कामी होता. परंपरेप्रमाणे प्रमाने यवतकरांकडून सर्व वारकरी बांधवासाठी पिठलं भाकरीचा बेत आखण्यात आला होता. आज पालखी सोहळा दौंड तालुक्यातील वरवंड च्या दिशेने मार्गस्थ झाला असून तेथे पालखी सोहळ्याचा मुक्काम होणार आहे.