दौंड
दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ.वंदना मोहिते यांना यवत पोलिसांनी राहत्या घरातून रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांच्यावर भादवि कलम 353,323,332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून नितीन भानुदास कोहक (पोलीस नाईक ब.नं 1888 नेमणुक पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 15 जून रोजी दुपारी 2:30 ते 3:00 वाजण्याच्या सुमारास कासुर्डी टोल नाका येथे वरील पोलीस नाईक नितीन कोहक, त्यांचे सोबतचे पोलीस उपनिरीक्षक रोकडे व इतर सहकारी शासकीय गणवेषामध्ये हजर राहुन पुण्याकडे जाणारी वाहतुक बंद करण्याचे कर्तव्य करत होते. त्यावेळी एक ग्रे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार नं एच 42 ए.एक्स 9329 मधील महिला वंदना मोहीते यांनी नितीन कोहक यांच्याशी हुज्जत घालुन त्यांच्या डाव्या गालावर चापट मारून ते करित असलेल्या शासकिय कर्तव्यास अडथळा निर्माण करुन जबरदस्तीने बॅरीकेटींग काढत तेथुन पुणे बाजुकडे निघुन गेल्या.
या सर्व प्रकारानंतर यवत पोलीस ठाण्यामध्ये डॉ. वंदना मोहीते यांच्याविरुध्द भादवि कलम 353,323,332 प्रमाणे कायदेशिर तक्रार देण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या राहत्या घरातून रात्री उशिरा अटक करण्यात आली. यावेळी दाखल अधिकारी पोउपनि प्रशांत मदने यांनी काम पाहिले तर अधिक तपास सपोनि माधुरी तावरे या करीत आहेत.