‛साक्षी कोल्हे’ चे नीट (Neet) परीक्षेत घवघवीत ‛यश’

देऊळगाव राजे (राहुल अवचर) : देऊळगाव राजे येथिल साक्षी संतोष कोल्हे या विद्यार्थिनीने नीट (Neet) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून साक्षीला ७२० पैकी ६०८ गुण मिळाले आहेत.

साक्षीचे दहावीपर्यंत शिक्षण दौंड येथिल सेंट सॅबेस्टियन हायस्कूल येथे झाले असून तिला १०वी मध्ये ९३% मार्क मिळाले होते. तर तीचे ११वी १२वी पर्यंतचे शिक्षण खानोटा येथील के.एस.के महाविद्यालय येथे झाले आहे. १२वी ला तीला ८९ टक्के मार्क होते. साक्षीचे वडील शेतकरी असून त्यांचा मोटार रिवाइंडिंगचा व्यवसाय आहे तर आई गृहिणी आहे.

ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील साक्षीने नीट (Neet) च्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवल्याने तिच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढे जाऊन नामांकित कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. ची पदवी संपादित करून रुग्णांची सेवा करणे हा तिचा मानस आहे.