दौंड : सद्गुरू चौरंगीनाथ महाराज पालखी चे केडगांववरून पंढरपुरकडे प्रस्थान झाले. चौरंगीनाथ महाराज बाबांचे पालखी चे रथ, बैलजोडी पूजन हे महंत योगी सोमवारनाथजी, महंत योगी तेजनातजी, पिर योगी गणेश नाथजी, पिर योगी शामनाथजी यांच्या हस्ते पार पडले. कै.भाऊसाहेब बाळु हंडाळ व त्यांच्या परिवाराकडून गेल्या ७७ वर्षांपासून या पालखी सोहळ्यासाठी बैल जोडी देण्याची परंपरा असून आजही ही परंपरा त्यांच्या परिवाराकडून जपली जात आहे.
सर्व विधी पार पडल्यानंतर हजारो वारकऱ्यांना घेऊन सद्गुरू चौरंगीनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. यावेळी परिसरातील विविध मान्यवरांकडून वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. पालखीचा पहिला मुक्काम हा केडगाव स्टेशन येथील मराठी शाळेत करण्यात आला.
सद्गुरू चौरंगीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये पिंपळसूटी, कडेठाण, राशिन, राजेगाव, मळद, बोरीपारधी, केडगाव, गिरीम, खुटबाव खोर, माळेवाडी, वरवंड, गोपाळवाडी, नाथाची वाडी, वाखारी, पाटस, हातवळण, कानगाव या गावांतील हजारो भक्तगण पालखीमध्ये सहभागी होत असतात.