पारगाव प्रतिनिधी (विकास शेळके) : दौंड आणि शिरूर तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र संगमबेट, वाळकी (ता. दौंड) येथील श्री. संतराज महाराज यांच्या पालखीचे आषाढी वारी निमित्त आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले यावेळी दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी संतराज महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वां वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यंदा संतराज पालखी सोहळ्याचे ५६ वे वर्ष असून दौंड व शिरूर तालुक्यातील शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. पालखीचा पहिला मुक्काम हा खुटबाव खाडे वस्ती या ठिकाणी असतो.