सुधीर गोखले
कोल्हापूर : राम राम मंडळी लय भारी … हि गर्दी पाहून विरोधकांचा काटा किर्रर्र .. टांगा पलटी ,,, पण घोडे फरारी नको अशी साद आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खास शैलीत कोल्हापूर वासियांना घातली.. कोल्हापूरच्या, कोल्हापूरकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे कोल्हापुरातील टोल आम्ही उठवला त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षांपासूनची खंडपीठाची मागणीही लवकरच पूर्ण होईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू अशी ग्वाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आज कोल्हापुरातील तपोवन मैदानात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले कि कोल्हापूर ची माती हि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे इथल्या मातीने अनेक गोष्टी शिकवल्या त्यात संघर्ष हि आहेच, कोल्हापूरकरांचा विषयच नेहमी हार्ड असतो काहीतरी वेगळे करून दाखवण्याची धमक इथल्या मातीत आहे.
आमच्या सरकारने अनेक लोकउपयोगी निर्णय घेतले आताचे सरकार हे लोकांच्या जनतेच्या मनातील सरकार आहे. आमच्या सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित १५०० कोटी निधीला मान्यता दिली आहे.
आमच्या सरकारने जवळजवळ २९ सिंचन प्रकल्पाना मान्यता दिली आहे नमो शेतकरी योजना मंजूर करून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६००० रु मिळणार आहेत तसेच लेक लाडकी योजनेमध्ये मुलीला तिच्या १८ व्या वर्षी रु १ लाख मिळणार आहेत मागील सरकारने कित्तेक चांगल्या योजनांना ब्रेक दिला होता तो स्पीड बेकार आम्ही काढून टाकला असून केंद्राकडून आमचा प्रत्येक प्रस्ताव कोणतीही काटछाट न करता मंजूर केला जात आहे आज राज्यामध्ये आम्हाला दोघांनाही म्हणजे मुख्यमंत्री म्हणून मला आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेन्द्रजी याना चांगली पसंती मिळत आहे.
लवकरच आम्ही पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणावर सुद्धा योग्य चांगला पर्याय शोधून काढू असेही ते यावेळी म्हणाले
उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित कोल्हापूर च्या दौऱ्यावर येणार होते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायनसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना विमान प्रवास टाळून विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे सांगण्यात आले तसेच त्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर चे पालकमंत्री दीपक केसरकर, खा. धैर्यशील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.