| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर तिघांनी कोयता, गज आणि बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.16 मे रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास यातील जखमी युवक हुसेन रमजान सय्यद यांचे हलाल चिकन सेंटरच्या बंद दुकानासमोर आरोपी सागर प्रकाश रानवडे, सुनील नारायण रानवडे, विक्रम उर्फ आकाश प्रकाश रानवडे यांनी संगनमत करून
जुने भांडणाचे कारणावरून हसन रमजान सय्यद यास शिवीगाळ दमदाटी करून हाताने, लाथा बुक्याने मारहाण करत यातील एकाने लाकडी बॅट पाठीवर तर दुसऱ्याने कोयता उजवे पायाच्या गुडघ्यावर मारत लोखंडी गज डोक्यात मारून जबर जखमी केले.
यावेळी यातील फिर्यादी समीर रवींद्र नातू (रा.पिंपळगाव ता.दौंड) व फिर्यादीचा मित्र मनोज वाल्हेकर हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही आरोपींनी हाताने, लाथाबुक्याने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.
या सर्व प्रकारानंतर समीर नातू यांनी रीतसर यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून वरील 3 आरोपींवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.