पुणे : भाजपच्यावतीने बारामती लोकसभा मतदारसंघची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदासंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्यावतीने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
त्यावेळी कमी कालावधीतहि कांचन कुल यांनी खा.सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदासंघांत चांगली लढत देत त्यांचे मताधिक्य रोखण्यात यश मिळवले होते. तसेच त्यांनी केलेल्या वातावरण निर्मितीमुळे भाजपला आपली ताकद या संघात वाढविण्यात यश आले होते. त्यामुळेच आगामी बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपाने आमदार कुल यांच्याकडे दिली असावी अशी चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.