आज दौंडमधील 18 गावांत 49 कोरोना बाधित रुग्ण, केडगाव ने टाकले यवत ला मागे



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सध्या यवत आणि केडगाव या 2  मुख्य गावांमध्ये जास्त की कोरोना रुग्ण आढळून येत असून यात सध्या केडगाव आघाडीवर आहे.

दि.16 मे रोजी 174 रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून आजच्या अहवालामध्ये तब्बल 49 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात 32 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश असून निगेटिव्ह आलेल्यांची संख्या 125 आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

यवत -7, केडगाव -9, वाखारी -4, राहू -5, नाथाचीवाडी -2, कासुर्डी -1, दापोडी -2, पिंपळगाव -2, भोसलेवाडी -1,लडकतवाडी -1, ताम्हणवाडी -1, खोर -2, खुटबाव-1, सहजपूर -1, दहिटणे-1, खामगाव -5, एकेरवाडी -3, नायगाव -2. 

तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी घरात बसणे, खरेदीसाठी बाहेर पडल्यास सुरक्षित अंतर ठेवणे आणि मास्क परिधान करणे या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे मात्र या दोन्ही गोष्टींचा अभाव या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे.

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर त्यासाठी नागरिकांनी स्वतःला काही बंधने घालणे हि काळाची गरज बनली आहे अन्यथा कोरोना साथ कधी जाईल याबाबत कुणालाच ठामपणे सांगता येणार नाही हे मात्र नक्की.