| सहकारनामा |
पुणे : कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळणारे हॉटेल, मंगलकार्यालय, शॉपिंग सेंटर, हॉकर्स यांच्यावर आज संपूर्ण पुणे जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करत सुमारे 3 लाख 26 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे.
यात दौड पोलीस स्टेशन हद्दीतील नगरमोरी चौक, ता.दौड जि.पुणे येथे विकास विश्वनाथ रणपिसे (वय २९ वर्षे, रा.कस्तान चाळ दौड, ता.दौड, जि.पुणे) हा आरोपी हे तोंडाला मास्क न लावता अत्यावश्यक सेवेशिवाय विनाकारण फिरून आपल्या या कृतीने संसर्गजन्य रोग पसरू शकतो हे माहीत असतांनाही त्याचे ताब्यातील वाहनावरून विनाकारण प्रवास करताना तसेच दळणवळणाची साधणे याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लघंन करून हयगईचे कृत्य करताना आणि वैदयकीय सुरक्षेसंबंधी काहीएक आवश्यक काळजी न घेतलेल्या स्थितीत आढळुन आला आहे. म्हणुन दौड पोलीस स्टेशन यांनी वरील आरोपी विरूध्द भा.द.वि. कलम १८८,२६९ राट्रीय आपत्ती कायदा २००५ चे कलम ५१ (ब) महाराष्ट्र कोविड- १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे साथीचा रोड प्रतिबंधक कायदा १८९७ मधील खंड २,३,४.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई ही देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरूध्द करण्यात आली असून शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील ता.शिरूर, जि.पुणे. येथे आरोपी दीपक अजबराव सरकटे, (रा. शिवशाही हॉटेल आमदाबाद, ता.शिरूर,जि.पुणे) याच्या
ताब्यातून १) १९२० रूपये किंमतीच्या मेक्डोल नंबर वन कंपनीच्या १८० मिली मापाच्या १२ सीलबंद बाटल्या प्रत्येक
बाटली किंमत १६० रूपये दराप्रमाणे, २)६३४/-रूपये किंमतीच्या टॅगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या १८० मिली मापाच्या एकूण १२ सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत बाटली किंमत ५२ रूपये दराप्रमाणे, असा एकुण २५४४/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दुसरा आरोपी राजू रतन सरकार, (ता.शिरूर, जि.पुणे) याच्या ताब्यातून ४,८००/-रूपये किंमतीचा मॅक्डोनाल नंबर वन कंपनीच्या १८० मिली मापाच्या सिलबंद बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत १६० रूपये दराप्रमाणे,२)१२६०/- रुपये किमतीच्या इंम्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या १८० मिली मापाच्या सिलबंद बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रूपये १४० रूपये दराप्रमाणे, ३)१३००/-रूपये किंमतीच्या टॅगोपंच कंपनीच्या देशी दारूच्या १८० मिली मापाच्या एकुण २५ सिलबंद बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत ५२ रूपये दराप्रमाणे, असा एकुण ७३६०/-रूपये
किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच तिसरा आरोपी सुमित रणजित बडगुजर, (वय २५ वर्षे, रा.जय भवानी हॉटेल आमदाबाद, ता.शिरूर,जि.पुणे) यांचे
ताब्यात १९२०/-रूपये किंमतीच्या मॅक्डोनाल नंबर वन कंपनीच्या १८० मिली मापाच्या १२ सीलबंद बाटल्या
प्रत्येकी बाटली किंम १६० रूपये दराप्रमाणे, २) ६२४/-रूपये किंमतीच्या टॅगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या १८० मिली मापाच्या एकुण १२ सीलबंद बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत ५२ रूपये दराप्रमाणे असा एकुण २५४४/रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील आरोपी यांचे ताब्यातुन एकुण १२,४४८/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन.
सदरचा मुद्देमाल आरोपी यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले स्थितीत मिळुन आले आहेत. या आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन मध्ये मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.