शालेय ‛फी’साठी तगादा लावला तर शालेय शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही! क्रांतीकारी आवाज संघटनेचा राज्यभर निवेदन देऊन सरकारला इशारा..



| सहकारनामा |

पुणे : पाठीमागील वर्षी एक ही दिवस शाळा भरली नसताना खासगी शाळांनी शंभर टक्के फी वसुली केली आहे. आता या वर्षी सुद्धा शाळा कधी भरणार आहे आणि किती दिवस भरणार आहे हे माहिती नसताना अनेक शाळा फी वसुली करत आहेत. अनेक संकटानी पालकांचे कंबरडे मोडले असताना खासगी संस्था चालक नफा कमवण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थानकडून फी वसुली झाली तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा क्रांतीकारी आवाज संघटनेने दिला आहे.

शालेय शिक्षण मंत्र्यांनी वर्षा शाळा सुरु झाल्याशिवाय फी भरू नका हे आवाहन केले आहे मात्र हे आवाहन असल्याचा आरोप संघटनेतील कार्यकर्त्यांनी केला असून केवळ संस्थेचे हीत लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कारण शाळा सुरु करून फी वसुली केली जाईल नंतर कोरोनाची तिसरी लाट आली आणि पुन्हा वर्षभर शाळा बंद राहीली तर याची जबाबदारी कोण घेणार. असा सवाल क्रांतीकारी संघटनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे सन 2021/22या शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक फी फक्त दहा टक्के घेऊन उरलेली फी शैक्षणिक वर्ष संपल्यावर घेण्यात यावी अशी मागणी संघटनेने निवेदन देऊन केली आहे. 

क्रांतीकारी आवाज संघटनेच्या वतीने आज बारामती, सोलापूर, सातारा, नागपूर जिल्ह्यात निवेदन देण्यात आली आहेत तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना ही निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र टकले यांनी दिली आहे.